Typing Test Software For
Maharashtra Public Service commission,
MPSC Clerk Typist English Test
Subject :Typing Test
Live Test Schedule Morn. Session 6 AM TO 7 AM And Even. Session 7 PM to 8 PM Sepecial For Typing Test If any Porblem Than
Click Below Link to Start Marathi
MPSC Marathi Gail Typing Test Link
MPSC Clerk Typist English Typing
यूजर एंड पासवर्ड रजिस्ट्रेशन के टाइम वाला डालना है अगर कोई गलत एंट्री करेंगे तो लोगिन न होकर
पॉपअप मेसेज आ जायेगा
New User Register Here

MPSC Clerk Typist English Typing Test, RKC NAWADA, English Typing (2000 Strokes @5 Strokes 400 Word), Keyboard Test (5 mins) + Break (5 mins) + Mock (10 mins) + Break (2 mins) + English Typing (10 mins)/(15 Mins for Divyang Candidates) 32 mins (For Divyang Candidate 37 Mins) Extra Notice
मराठी आणि इंग्रजी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध झालेली आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी नियोजित परीक्षेला बसणारे उमेदवार ही मोक टेस्ट देऊ शकता. परीक्षेला बसण्यापूर्वी जरूर द्या टायपिंग टेस्ट तसेच MPSC टायपिंग टेस्ट बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्रातील विविध विभागातील स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा आयोगाकडून स्पष्टता : मात्र मराठीसाठी ३०० पैकी २७९ अचूक शब्द अनिवार्य लिपिक व कर सहायक संवर्गासाठी काही उमेदवारांकडून बोगस टंकलेखक प्रमाणपत्र सादर करण्यात येत होते. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) टंकलेखन कौशल्य चाचणी घ्यायचे ठरविले असून, त्यासाठी मॉक लिंक उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मराठी/हिंदी की-बोर्डसंदर्भात उमेदवारांचा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मराठी रेमिंग्टन की-बोर्डच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मराठी टंकलेखनासाठी ३०० पैकी २७९ किंवा त्याहून अधिक तर इंग्रजी टंकलेखनासाठी ४०० पैकी ३७२ किंवा त्याहून अधिक अचूक शब्द टंकलिखित करावे लागतील,असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मंत्रालयीन लिपिक टंकलेखक व कर सहायकांना पूर्व आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘टायपिंग’ची परीक्षा उत्तीर्णची अट आहे. एक हजार ४६४ जागांसाठी राज्यातील जवळपास दीड लाख उमेदवारांनी परीक्ष दिली. पूर्व आणि मुख्य परीक्षेनंत आता ७ एप्रिलला टंकलेखन कौशल्ट चाचणी घेण्यात येणार आहे. य चाचणीच्या आठ दिवस आर्ध म्हणजेच २९ मार्चला एमपीएससीने नवीन सॉफ्टवेअर (डेमो) उमेदवारांन पाठविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक २३ मार्च, २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी मॉक लिंक उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने संदर्भाधीन प्रसिध्दीपत्रकानुसार मॉक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. २. प्रस्तुत मॉक लिंक मधील मराठी टंकलेखनाच्या Keyboard Layout बाबत काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर मॉक लिंक टेस्ट मधील मराठी टंकलेखनाचा Keyboard Layout हा केवळ उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपध्दती व स्वरुप अवगत व्हावे याकरीता अतिरिक्त सुविधेच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी संगणकीय प्रणालीवर आधारित मराठी टंकलेखन चाचणीचा सराव हा ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout वरच करावा, कारण प्रत्यक्ष टंकलेखन चाचणीकरीता उमेदवारांना ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout हाच पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३. उमेदवारांच्या माहितीकरीता प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उपलब्ध करून देण्यात आलेला ISM V6 प्रणालीवरील Remington Marathi Keyboard Layout सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये चित्रात्मक स्वरुपात दर्शविण्यात आलेला आहे. ४. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी स्वरुपाची असून, चाचणीचा तपशील खालीलप्रमाणे राहील :- ४.१ मराठी टंकलेखन :- (१) अमागास उमेदवारांसाठी – ३०० (साधारणपणे १५०० Key Depression) शब्दांपैकी किमान २७९ किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे. (२) अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी ३०० शब्दांपैकी किमान २७० किंवा त्यापेक्षा जास्त अचुक – शब्द टंकलिखित करणे. ४.२ इंग्रजी टंकलेखन :- (१) अमागास उमेदवारांसाठी ४०० (साधारणपणे २००० Key Depression) शब्दांपैकी किमान ३७२ किंवा त्यापेक्षा जास्त अचूक शब्द टंकलिखित करणे. (२) अमागास वगळता इतर सर्व पात्र आरक्षित उमेदवारांसाठी ४०० शब्दांपैकी किमान ३६० किंवा त्यापेक्षा जास्त अचुक – शब्द टंकलिखित करणे. ५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अपंग-२०१६/प्र.क्र. ११६/१६-अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकिर्ण-२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जुन, २०१९ नुसार अनुक्रमे पात्र दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखन अर्हता चाचणी अनिवार्य नाही.